खामगांव(श्रीकृष्ण चौधरी) तालुक्यातील लाखनवाडा खुर्द ग्राम पंचायत निवडणूक मागील वर्षी पार पडली होती, त्या निवडणुकीमध्ये अर्शद बेग मुस्ताक बेग यांची सरपंच पदी निवड करण्यात आली होती, परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ग्राम पंचायत लाखनवाडा खुर्द येथे सरपंच पद रिक्त झाले होते त्यामुळे, या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया घेऊन निवडणूक अधिकारी भिल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 28 मार्च 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.या प्रक्रिया मध्ये सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज सौ कविता विलास वानखेडे यांचा प्राप्त झाला या अर्जाच्या विरोधात कुठल्याही प्रकारचं अर्ज प्राप्त झाला नाही त्यामुळे सौ कविता विलास वानखेडे याची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या वेळी ग्राम पंचायत सदस्य अतुल विलास पांढरे,सौ रेखाताई अनिल पांढरे,उपसरपंच रवींद्र वानखेडे, व इतर ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते,सरपंच पदाची निवडून प्रक्रिया पार पाडण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामसेवक अमोल मोरे, ग्राम पंचायत कर्मचारी मोसिन बेग, कोतवाल योगेश पांढरे,हीवरखेड पोलीस स्टेशन चे बीट जमदार श्भोपळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती,त्याच प्रमाणे या वेळी ग्राम लाखनवाडा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री, सुगदेव वाकोडे तसेच शब्बीर बेग,विलास वानखेडे,नाना वानखेडे,अनिल पांढरे, आदींनी नवनिर्वाचित सरपंच यांना गावच्या विकास कामाकरीता शुभेच्छा दिल्या.