जळगाव जामोद : तालुक्याच्या ग्राम जामोद येथे दोन परिवारामध्ये लग्नाच्या नकार दिल्याने वाद झाला ज्यामधे एकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सैय्यद अमीन सैय्यद अफसर यांनी दिलेली तक्रार मध्ये सांगितले की जखमी रसूल खान यांची मुलगी ही दहावी कक्षा मध्ये शिक्षण घेत असताना आरोपी शेख सद्दाम हे नेहमीच त्याला टाॅनटिंग करत त्रास देत होता. सद्दामला मुलीचे काका मृतक नूरखान यांनी त्याला समजावून सांगितले होते. त्यानंतर सद्दाम याचे वडील त्या मुलीच्या वडीलाकडे लग्नाची मागणी करण्याकरीता गेले होते. परंतु त्यांनी मुलगी देत नाही असे म्हटल्यावर सद्दाम याने त्यांना धमकावले व तुम्ही मुलगी देत नाही तर मुलीला पळवून नेल्यानंतर मुलगी द्याल का ? असे म्हणाला होता.
त्यानंतर मुलीचे काका नूर खान यांना प्रकरण शांत करण्यासाठी बोलवले होते, परंतु त्यांनी नकार दिल्याने व मागील वादाचे कारणावरून त्यांच्यात बोलचाल वरून वाद निर्माण झाला आणि मृतक नूरखान यास सद्दाम ने घरा मध्ये मारहाण करत त्यांना रस्त्यावर आणले. त्यावेळी शेख सद्दामच्या घरासमोर मृतक नुर खान समशेर खान यास आरोपी शेख बशीर याने डोक्यात लोखंडी रॉडने वार केला आणि तो जागीच खाली पडला. यावेळी त्याला सोडवण्यासाठी त्याचा भाऊ रसूल खान समशेर खान हा आला असता त्याला आरोपी सद्दाम ने त्याच्या पोटावर, मांडीवर आणि डोक्यात वार करून मारहाण करुन जखमी केले.
शेख नजीर याने मृतक नूर खान चे पायावर काठीने मारहाण केली त्यावेळी तिथे हजर असलेले शेख इम्रान, मोहम्मद निशाद, शेख मुफिज़, रफिक खान, शेख असलम, स्माईल खान यांनी त्यांनी ग्रामीण रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता डॉक्टरांनी समशेर खान यास तपास केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
आणि जखमी रसूल खान समशेर खान याच्या प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव येथे रेफर करण्यात आले. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध पोलिसांनी ७२८/२०२१ कलम ३०२, ३०७,३४ भादंवि गुन्हा नोंदविला असून पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे हे करीत आहे.