खामगांव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून वाढत आहे विशेषतः ग्रामीण भागात लग्न समारंभामध्ये गर्दी करण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येत आहे. लग्नसमारंभात निश्चित संख्येपेक्षा अधिक लोक आढळल्यास वधू-वरांच्या कुटुंबीयावर कारवाई होणार आहे. ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण वाढत असल्याने नव्या कोरोना निर्बंधनुसार लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त २५ लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र या सर्व नियमांना पायदळी तुडवत आज खामगांव तालुक्यातील चिखली खुर्द येथील एका लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती पहावयास मिळाली. या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी अचानक पणे भेट दिली. यावेळी लग्नसमारंभात २५ पेक्षा जास्त लोकांची गर्दी त्यांना त्यांना दिसून आली.
https://www.facebook.com/watch/?v=1370766203257536
यावेळी वधु-वरासोबत सर्वांची एकच धांदल उडाली होती. यावेळी ओंकार किसन तांदळे वय ५५ रा. चिखली खुर्द ता. खामगाव यांनी लग्न समारंभाचा कार्यक्रम सुरू करून मोकळ्या जागेत मंडप टाकून आपल्या मुलीचे लग्न समारंभचा कार्यक्रम सुरू केला होता. या लग्नसमारंभात ३५ ते ४० लोकांची उपस्थिती यावेळी दिसली. हे सर्व लोक सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत नसल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले व त्यातील काही लोकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे सुद्धा या वेळेस दिसून आले. लग्नसमारंभासाठी २५ व्यक्तीच उपस्थित राहून लग्न समारंभ करावा असा शासनाचा आदेश असून सुद्धा शासन आदेशाची पायमल्ली केल्याची या ठिकाणी दिसून आले आहे. सरकारकडून सोशल मीडिया व विविध प्रकारे जनजागृती करून सुद्धा लोक ऐकत नाही. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेश कलम १४४ लागू असून संचारबंदी व लॉकडाऊन तसेच इतर निर्णयाचे उल्लंघन केले आहे असे सांगून त्यामुळे वधूपिता ओंकार किसन तांदळे व वरपिता सुखदेव इंगळे रा. येनगाव ता. बोदवड जि. जळगाव यांच्यावर ७०/२०२१ कलम १८८ नुसार जलंब पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.