मेहकर:-मेहकर येथे एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून व तिच्या मुलाला नोकरीवर लावण्याचे आश्वासन देऊन मागील १० ते १२ वर्षापासून महिलेच्या इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक सबंध प्रस्थापित करत तिचे शारीरिक शोषण करून सदर महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी मोठ्या पक्षाच्या माजी शहर प्रमुख तथा माजी नगर परिषद सदस्य विकास विजय जोशी यांच्यावर विविध कलमा अंतर्गत मेहकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार पीड़ित महिलेने मेहकर पोलिस स्टेशनला काल १७ मे रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आरोपी विकास विजय जोशी वय ५४ वर्ष रा.रामनगर मेहकर याने तुझ्या मुलाला नोकरीवर लाउन देतो व तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष देऊन माझ्या सोबत मागील १० ते १२ वर्षापासून मेहकर बायपास वरील लॉज वर तसेच विकास जोशी चे फार्म हाऊस वर माझे इच्छे विरुद्ध वेळोवेळी माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवले व माझे शारीरिक शोषण केले तसेच माझे शरीरीक संबंध करतांनाचे वीडियो शूटिंग काढून माझा अश्लील वीडियो सोशल मीडियावर व्हायरल करून माझी समाजात बदनामी केली.तरी सदर विकास जोशी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीड़ित महिलेने केली आहे.महिलेच्या फिर्यादी वरुन मेहकर पोलिसांनी अप.क्र.279/2022 कलम 376,376(2)(N), 354(C),417,292भादवीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम,सुधारणा अधिनियम कलम 67,67(अ) नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेसी करत आहेत.
previous post