April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी चिखली जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा

लक्झरी बसची एपेला जोरदार धड़क ; एक जण ठार

अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद

बुलडाणा : चिखली-खामगाव मार्गावरील पेठ गावाजवळ भरधाव लक्सरी बसने एपेला उडवल्याची घटना शुक्रवारी 12 मार्च रोजी सकळी घडली आहे. एपे चालक युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, किशोर गजानन इंगळे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेचे दृष्य परिसरातील लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. किशोरने गहू चाळणी करण्याचे यंत्र घेतले होते.ते यंत्र त्याने एपेला जोडले होते. शुक्रवारी सकाळी तो पेठ येथे यंत्र घेऊन येत होता. दरम्यान चिखली-खामगाव मार्गावरील पेठ गावाजवळ पुण्यावरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव लक्सरी बसने त्याला उडवले. त्यात एपे उलटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लगेच त्याला उपचारासाठी चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर घटनेचे दृष्य परिसरातील लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.किशोर होतकरू आणि घरातील कमावता होता. किशोरच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाल्याने आई आणि छोट्या भावाचा तोच आधार होता. या अपघाताने तो आधारच हरवला असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Related posts

खामगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा संपन्न,अनेक प्रकरणांना मंजुरात

nirbhid swarajya

घारोड गावातील वादग्रस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

nirbhid swarajya

महाबिज कंपनीचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांनावर दुबार पेरणीचे संकट

nirbhid swarajya
error: Content is protected !!