वंचित बहुजन आघाडीचे नगर पालिकेला निवेदन
खामगांव : स्थानिक लक्कडगंज भागातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मुख्य पाईपलाईनला जोडावी तसेच परिसरातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या नेतृत्वात ९ ऑगस्ट रोजी नगर पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद केले आहे की,लक्कडगंज भागातील नळाला पुरेसे पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच प्रभागातील बोअरवेल मागील कित्येक वर्षापासून बंद असल्यामुळे नागरिकांना वापरण्याच्या पाण्यासाठी सुध्दा दुसरीकडे जावे लागते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७६ वर्षाचा कालावधी झाल्यावर सुध्दा नागरिकांना त्यांच्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. नगर परिषदेकडून सदर परिसरातील नागरिकांकडून विविध प्रकारचे टॅक्स नियमित वसुल करण्यात येतात. तरी नगर परिषदेने लक्कडगंज भागातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मुख्य पाईपलाईनला जोडणेबाबत तसेच परिसरातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करणेबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अन्यथा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने भविष्यात आंदोलन छेडण्यात येईल व त्यापासून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, अमित फुलारे, अशोक वानखेडे, चेतन मोहता, प्रकाश वानखेडे, मुकेश बुध्ददेव, अर्जुन ठाकूर, आश्विन खंडारे, शेख शकील, गजानन पाटील, सुनिल गुळवे, संजय हिंगणे, सुमित छापरवाल, करण छापरवाल, गगन वानखेडे, संदेश अवसरमोल, चंद्रकांत टेरे उपस्थीत होते.l फोटो –