बुधवारी सकाळपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्वात जास्त परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असून , आतापर्यंत11 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिस्थती लक्षात घेऊनसरकारने मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पार्टील यांनी केली आहे.विधानसभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की कोरोना व्हायरस महाराष्ट्रात सुद्धा आला असून पुण्यात रुग्णआढळून आले आहे. तर लोकांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्क आणि हँण्ड वॉश हे सर्वसामान्य व्यक्तींना घेणेपरवडणारे नाही. त्यामुळे किमान रेशन घेणाऱ्या कुटुंबांना उपलब्ध करुन देण्याची मागणी पाटील यांनी केली.
previous post