संग्रामपुर : अकोला खंडवा रेल्वे मार्गाचं रुंदीकरण सध्या सुरु आहे, हा मार्ग रेल्वे मंत्रालयानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार आहे. पण हा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून न करता बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाने न्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व या भागातील आदिवासी सरकारच लक्ष वेधण्यासाठी मोठ आंदोलन
बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वारखेड़ गावाजवळ सुरु आहे. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून हा मार्ग पर्यायी मार्गाने करायची मागणी केली होती. कालच वाघाना वाचविण्यासाठी मुख्यमंत्रानी वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी व काही आदिवासी यांनी हे आंदोलन सुरु केले आहे.या भागातील आदिवासी व शेतकऱ्यांसाठी हा रेल्वे मार्ग बुलढाणा जिल्ह्यातून तयार करावा, जेणेकरून बुलढाणा जिल्हयातील आदिवासी भागाचा विकास होऊन या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला वाहतूक करण्यासाठी रेल्वेची मदत होईल,अश्या प्रकारची मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. त्याकरीता आज सकाळी या भागातील आदिवासी व स्वाभिमानी शेतकरी संघटना या रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले आहेत. रेल्वे मंत्रालयाला व सरकारला जागे करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात सकाळी पहाटे पासून शेकडो शेतकरी रस्त्यावर आले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प रेल्वे मार्ग रद्द करून, अकोट,बुरहानपुर हा बुलडाणा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग झाला पाहिजे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे. जंगल वाचलं पाहिजे व वाघ ही वाचले पाहिजेत,यासाठी स्वाभिमानीचे हे आंदोलन सुरू आहे. रेल्वे मार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार कडून जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनी महात्मा गांधींच्या विचाराने आंदोलन करण्यात येत आहे. जर आमच्या हया सर्व मागण्या पुर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा या आंदोलनातून स्वाभिमानीकडून सरकारला देण्यात आला आहे.