मुंबई : रेल्वेचा प्रवास करताना अनेकदा सामानाची चिंता आपल्याला असते आणि बऱ्याच वेळा रेल्वे प्रवासामध्ये सामान चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. एका महिलेच्या बाबतीत घडलेल्या अशाच प्रकाराने मात्र, न्यायालयाने दिलेला निर्णय खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. दिल्ली ते सिकंदराबाद दरम्यान प्रवास करताना एका महिला प्रवाशाचे सामान चोरीला गेले होते. याप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे त्या महिलेने धाव घेतली. आयोगाने संबंधित महिलेला १ लाख ३३ हजार रूपयांची भरपाई देण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. रेल्वेच्या सीटखाली लगेज बांधून ठेवण्यासाठी साखळी नव्हती. तसेच रेल्वे प्रोटेक्शन ग्रुपच्या जवानांनी अनधिकृतपणे विनातिकीट डब्यात घुसणाऱ्या लोकांना रोखले नाही. त्यामुळेच चोरी झाली. त्यामुळे ही चोरी झाली असल्याचे महिलेने न्यायालयात सांगितले. आपल्या बॅगमध्ये मौल्यवान दागिने आणि महागड्या साड्या होत्या असे तक्रारदार महिलेने म्हटले. व सर्व गोष्टी जाणून घेतल्या नंतर त्या महिलेची बाजू न्यायालयाने मान्य केली. रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १०० नुसार प्रवाशांनी ठराविक सामान वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या सुविधा घेतल्या नसतील तर सामान चोरी आणि तोडफोडीची जबाबदारी आमची नाही असा पवित्रा रेल्वे प्रशासनाने घेतला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेचे म्हणणे फेटाळून लावले.त्या महिलेला १ लाख ३३ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, रेल्वेच्या असुविधांमुळे चोरी झाल्यास रेल्वेच जबाबदार असल्याचा महत्वपुर्ण निर्णय सुद्धा दिला आहे.
previous post