जळगांव जामोद:केंद्रातील भाजपा सरकारने ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम या भाजपने केलेआहे.सर्वसामान्य,शेतकरी,गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी.त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये.युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपने मागे घ्यावा अन्यथा याही पेक्षा तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशेयाचे निवेदन यावेळी रा.यु.काँग्रेस च्या उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष पराग पाटील,विधानसभा अध्यक्ष प्रकाशशेठ ढोकने,तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ,शहर अध्यक्ष अजहर देशमुख,माजी तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे,ता.सचिव संभाजी ठाकूर,रा.यु.काँग्रेसचे आशिष वायझोडे,शेख ताहेर,दत्ता डीवरे,सिद्धांत हेलोडे,निजाम राज,निखिल पाथ्रीकर,आकाश जाणे,सुनील गायकी,योगेश बोराखडे,मोईन राज,प्रशांत गावंडे,अतुल मानकर,सय्यद उमेर, कुरबान खान, मोहम्मद अक्रम पठाण,आसिफ खान, मोहम्मद अजिम, नाजीम सय्यद, साबिर मोहम्मद,सलमान खान,विशाल पाटील वाघ,वासीक खान,एमडी रेहान ,फुरकान खान उमर शेख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते