शेगाव: दर्शन घेऊन खऱ्या अर्थाने भारत जोडो यात्रा चळवळीला सुरुवात होणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव देवानंद पवार यांनी शेगाव येथे सभास्थळावर पाहणी दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना म्हटले आहे,शेगाव बाळापुर रोडवर राहुल गांधी यांची 18 नोव्हेंबर रोजी ज्या ठिकाणी सभा आयोजित होणार आहे त्या बाळापुर रोडवरील यांच्या शेतात सभास्थळावर सुरू असलेल्या सभा मंडप व इतर तयारीचे निरीक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव देवानंद पवार दुपारी दोन वाजे दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राम विजय बुरुंगले,काँग्रेस पक्षाचे खामगाव मतदार संघ नेते प्रदेश प्रतिनिधी नाना उर्फ ज्ञानेश्वर दादा पाटील, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष किरण बापू देशमुख, काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक केशव हिंगणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी राज्यस्तरीय नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी देवानंद पवार यांनी सांगितले की या सभेला पाच लाख लोक उपस्थित राहणार असून श्रीसंत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेऊन राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपूर्ण देशात यशस्वी व्हावी यासाठी खरी चळवळीला बळ प्राप्त होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.