बुलढाणा जिल्ह्यात ही पदयात्रा तीन दिवस असणार आहे. त्यामुळे सभेच्या नियोजनासाठी सभास्थळाची पाहणी करणे , आगमन व निर्गमन, रस्त्यांची पाहणी करणे यासाठी राहुल गांधींच्या पदयात्रेआधीच या नेत्यांची पदयात्रा शेगाव परिसरात दिसत आहे. या यात्रेला जवळपास सहा लाख लोकं येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देवानंद उमाळे सरचिटणीस काँग्रेस यांनी दिली आहे. काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल, असे काँग्रेस सरचिटणीस देवानंद उमाळे यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या स्वागताच्या नियोजनासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिचा शेवट होणार आहे.
previous post