खामगाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय वर्ष शिक्षा वर्गाचा शुभारंभ सोमवारी सकाळी स्थानिक सरस्वती विद्या मंदिरात करण्यात आला.
९ ते २९ मे या कालावधीत आयोजित द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे उदघाटन संघाचे क्षेत्रीय प्रचारक अतुलजी लिमये यांनी वर्गधिकारी परमानंदजी राठोड आणि वर्गकार्यवाह राजेंद्रजीउमाळे यांच्या उपस्थितीत भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून केले. याप्रसंगी शिक्षार्थींना संबोधित करताना अतुलजी लिमये म्हणाले येथे येणारे शिक्षार्थीं विविध जिल्ह्यातील असले तरी हृदय एक आहे. संघशिक्षा वर्गात प्रशिक्षण घेऊन समाज परिवर्तनाचे आपण वाहक बनलो पाहिजे. त्यासाठी आपण स्वतः मूल्यधारीत जीवन जगायला शिकलं पाहिजे.शिक्षार्थ्यांची स्वतःचे विचार, कार्य यावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा आणि समर्पणासह साधना करत प्रत्येक शिक्षार्थींने संघाच्या कल्पनेतील कार्यकर्ता होण्याचा संकल्प करावा.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय वर्ष शिक्षा वर्गात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्व जिल्ह्यातील १८३ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. पहाटे ४:३० ते रात्री १०:३० शारीरिक, बौद्धिक कार्यक्रम दररोज पार पडतील. या वर्गात मार्गदर्शनासाठी अभ्यासू राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील वक्ते खामगाव येथे दाखल झाले आहेत. सेवेचा संस्कार वृद्धिंगत करण्यासाठी दररोज श्रम साधना केल्या जात असून सकारात्मक राष्ट्रीय विचारांचे वक्ते व लेखक तयार होण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. २० दिवसांच्या खडतर प्रशिक्षणाचे सादरीकरण दि. २८ मे रोजी प्रकट कार्यक्रमात शिबिरार्थी करतील. यात योगासन, स्व संरक्षणासाठी-कराटे, सूर्यनमस्कार, समता अशा विविध घटकांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे “भारतीय संविधान”, “स्वराज्य ७५”, “राज्यभर चालणारे सेवाकार्य” या विषयाचे चित्रमय माहिती प्रदर्शन देखील येथे आयोजित केले आहे. या वर्गा दरम्यान विविध मान्यवरांच्या भेटीची योजना वर्गात केली आहे. वर्गासाठी विविध प्रांतातून प्रशिक्षक वर्ग दाखल झाला आहे. शिक्षा वर्गाचा समारोप जाहीर प्रकट कार्यक्रम आणि खामगाव शहरातून पथसंचलनाने होईल.
सरसंघचालक मोहन भागवत यांची राहणार उपस्थित…
खामगाव सरसंघचालक मोहनजी भागवत संघाच्या व्दितीय वर्ष वर्गासाठी येत आहे स्वरस्वती विद्या मंदिर खामगाव शिबिरात येत आहेत ३ दिवस चालणाऱ्या या वर्गासाठी खामगाव येथे मुक्कामी असल्यामुळे जिह्यातील पोलिस अधिकारी खामगाव दाखल झाले आहे शहरात राहणार चोख पोलीस बंदोबस्त….. मोठ्या प्रमाणात खामगाव शहरात पोलिस दाखल झाले आहे