खामगाव : महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत लॉयन्स ज्ञानपीठ शाळेच्या इयत्ता १० चा विद्यार्थी चि.हिमांशु वनारे याने २०० पैकी १७०.५६ गुण मिळवून ओ बी सी प्रवर्गातून ६२ वा मेरिट आला आहे. सदर परीक्षा राज्यस्तरावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ९४,५४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, महाराष्ट्रातून एकूण ७७४ विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी करण्यात आली आहे. ही परीक्षा १० मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. चि. हिमांशू ला लॉयन्स शाळेच्या प्राचार्या सौ. द्विवेदी मॅडम, डिझायर कोचिंग क्लासेस चे विवेक दांडगे सर तसेच आई वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.