खामगाव:महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा लजिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष ॲड नाजेर काझी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. देवेंद्र दादा देशमुख यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष आकाश खरपाडे यांची महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या खामगाव तालुका दक्षता समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्धल आकाश खरपाडे यांनी
जनसेवेची संधी दिल्या बद्धल मा. ना. राजेंद्रजी शिंगणे,ॲड नाजेर काझी,देवेंद्र दादा देशमुख, रावसाहेब पाटील,तालुका अध्यक्ष अंबादास पाटील यांचे आभार व्यक्त केले व खामगाव तालुक्यातील व शहरातील जनतेला राशन कार्ड व पुरवठा विभागाशी काही समस्या व तक्रारी असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आकाश खरपाडे मो. न. 7038084109 यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे.