मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी मोहीम सुरु
खामगांव : सर्व घटकांचा विचार करत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अविश्रांत वाटचाल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी ही मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भरातून एक कोटी पत्र पाठविण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक कांग्रेस खामगाव शहर व तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे या विनंतीचे पत्र पाठविण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश खरपाडे, तालुका अध्यक्ष भगवान लाहुडकार, विकास चव्हाण, रमाकांत गलांडे, सो.मिडिया अध्यक्ष दिलीप पाटील, विजय कुकरेजा, मिर्झा अक्रम बेग, अमोल बिचारे, प्रशांत धोटे, अजय धनोकार, राजेंद्र वराडे, अरविंद चव्हाण, अक्षय मोठे, सुरज थोरात, सुमित ठाकरे, आनंद ठाकरे, नावेद खान, सय्यद सुलतान, रईस पैलवान, शेख राजीक, शेख इस्माईल, इस्रायल शहा, आनंद तायडे, योगेश चोपडे, दिनेश जांबे, दिपक शिंदे, निखिल अतकरे, ओम शेटे, यांचीं उपस्थित होते.