खामगाव : नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन पक्षाच्या कार्यकर्त्यानी विविध कार्यक्रम राबवून साजरा केला गेला. पक्षात नव्या उमेदीच्या कार्यकर्त्याना बळ देण्याच्या दृष्टीने काम केल्या जाईल. तसेच पक्षा अतर्गंत जबाबदारी देऊन संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे सूतोवाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसह सर्वच वरिष्ठ नेत्यांनी केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह संघटनात्मक बदल सुरू झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातसुद्धा ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांचे नेतृत्वात १३ ही तालुक्यात नवीन पदाधिकारी नियुक्तीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुका व शहरस्तरीय आढावा बैठक घेणे सुरू आहे. शहरात उद्या होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने खामगाव मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या स्थापने पासून ते आज पर्यंतची पक्षांची स्थितीबाबत आढावा घेण्याचा केलेला प्रयत्न…. सण१९९९ मध्ये राजकारणातील चाणक्य म्हणून सबंध देशात ओळखल्या जाणारे शरदचंद्र पवार साहेबानी काँग्रेस पक्षातून विभक्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे जुने व मुरब्बी नेते व कार्यकर्त्यानी पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला खामगाव मतदार संघ सुद्धा अपवाद ठरला नाही.
खामगाव मतदार संघातील आजी माजी आमदारांसह दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले.या मध्ये माजी आमदार स्व.माणिकराव गावंडे, माजी आ.नानाभाऊ कोकरे, माजी नगर अध्यक्ष स्व.बाबासाहेब बोबडे, भाटिया, शिवाजीराव देशमुख, रावसाहेब पाटील, यांचेसह अनेक नेते राष्ट्रवादीत सामील झाले. यासोबतच काही युवा नेते व कार्यकर्त्यानी सुद्धा राष्ष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वावर पवार साहेबांनी स्थापन केलेल्या राष्ष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मात्र बुलडाणा जिल्हह्ह्यात डॉ. राजेद्रं शिंगणे यांचा सिंदखेड राजा मतदार संघ सोडल्यास एकही मतदार संघात विजय मिळाला नाही. त्यामुळे जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा जुन्या नेत्यांच्या गटातटात विभागण्यास सुरुवात झाली. खामगाव मतदार संघातही वाढत्या वयानुसार सक्रिय राजकारणापासून दुरावत असलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची संघटनात्मक पकड कमकुवत होत गेली. पंरतु अशा वेळीस स्थापनेपासूनच पक्षात काम करत असलेले युवा पदाधिकारी आपआपल्या परिने पक्षाचे भागदोड सांभाळण्याचा प्रयत्न करीत होते. या युवा नेत्यांपैकीच एक देवेद्र शिवाजीराव देशमुख हे होते. त्यांनी जुन्या नेत्यांना विश्वासात घेवून राष्ट्रवादीच्या घडाळयाची मंदावू पाहणारी टिकटिक येणकेण प्रकारे सुरु ठेवण्याचा अविरत प्रयत्न केला. स्थापनेपासून २० वर्ष झाल्यात ते आज पर्यन्त देवेद्र देशमुख पक्षवाढी साठी झटत आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या झेंडा हातात घेवून विविध कार्यक्रम राबवून नविन युवकांना पक्षात सामिल करुन पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न खामगाव मतदार संघात केला. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची ताकद वाढत असतांंना दुसरीकडे मात्र विदर्भासह खामगाव मतदार संघातही पक्षाला म्हणावे त्या प्रमाणात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यश मिळणे कठिण झाले होते. ना. डॉ.राजेद्रं शिंगणे सिंदखेड राजा मतदार संघासह सबंध जिल्हयात राष्ट्रवादी पक्षाला संघटनात्मक बळकटी मिळावी म्हणुन पदाधिकाऱ्याना त्या- त्या तालुक्यात हवी असलेली ताकद पुरविण्याचा सदोदत प्रयत्न करीत असतात. खामगाव मतदार संघातही देवेद्र देशमुख यांची पक्षाप्रती असलेली तळमळ बघून ना. डॉ.शिंगणे यांनी देवेद्रं देशमुख यांच्या पाठीशी राहून अनेक पदावर काम करण्याची संधी त्यांना दिली. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या जिल्हाअध्यक्षपद, राज्यकार्यकारणी युवक कॉग्रेस सरचिटणीस, अनेक मतदार संघात पक्षनिरीक्षण म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यानंतर रष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या खामगाव शहराध्यपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. सद्याच्या स्थितीत खामगाव नगर पालिकेमध्ये देवेद्रं देशमुख यांच्या माध्यमातून एकमेव नगरसेवक पद राष्ट्रवादी पक्षाला मिळाले. देवेद्र देशमुख यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारुन खामगाव शहरात पक्ष मजबूतीसाठी आपले प्रयत्न अधिक वेगाने सुरु केले. याचदरम्यान खामगाव शहरात प्रत्येक प्रभागात राष्ष्ट्रवादी पक्षाची कार्यकारणी तयार करुन नव्या उमेदीचे कार्यकर्ते जोडणे सुरु केले. त्यासोबत महिला वर्ग पक्षासोबत जोडावा म्हणून महिला मेळावे , महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिला रोजगार मिळावे, युवकासाठी पोलिस भरती प्रशिक्षण रोजगार मिळावे, अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा त्याकरीता बॅकींग तसेच अनेक कपन्याचे भरती मेळावे घेवून रोजगार उपलब्ध करुन दिला. २०० अधिक युवकांना बॅकिग सेक्टरमध्ये तर ५०० हून अधिक युवकांना पूणे, औरगांबाद सारख्या शहरामध्ये मोठया मोठया कंपन्यामध्ये रोजगार मिळून देण्याचे काम देवेद्र देशमुख यांनी केले. पालकमंत्री डॉ.राजेद्र शिंगणे यांच्याकडे सदोदीत प्रयत्न करुन त्यांच्या माध्यमातून खामगाव तालुक्यातील सिंचन प्रश्न, अनेक गावातील रस्ते, यासारखे प्रश्न सोडविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या सुरु असलेल्या जनउपयोगी कामांमुळे आज खामगाव शहरात राष्ष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची एक सक्षम अशी नविन फळी निर्माण झाली आहे. यामध्ये सुशिक्षित युवकांची संख्या ही उल्लेखनीय आहे. पक्षाचे विचार, पक्षाचे ध्येयधोरणे युवकांना पटवून दिल्याने आज सुशिक्षित युवक मोठया प्रमाणात पक्षासोबत जूडत आहे. आज राष्ष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची खामगाव शहरात प्रत्येक प्रभागात कार्यकारणी तयार असून आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील व प्रभागातील प्रत्येक वार्डात राष्ष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देवेद्र देशमुख यांच्या नेतृत्वात घराघरापर्यंंत पोहचत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात खामगाव शहरात नगरपारिषदेवर राष्ष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची पकड निश्चित पाहावयास मिळणार आहे. एकूण पक्ष स्थापनेपासून ते आजपर्यंत ना. डॉ. राजेद्र शिंगणे यांनी देवेद्र देशमुख यांच्या दाखविलेला विश्श्वसामुळेच हे शक्य होणार यात तीळ मात्र शंका नाही.