खामगांव : कोरोना सारख्या महाभयावह परीस्थीतीशी संपूर्ण देश लढत असतांना महाराष्ट्र राज्याची सत्ता हातुन गेल्यामुळे विचलीत झालेल्या भारतीय जनता पार्टीने कोरोना आपत्ती काळात एकत्रीत येवुन या संकटाला तोंड देवुन महाराष्ट्राच्या जनतेला आधार देण्याची गरज आहे त्यावेळी महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा विचार न करता महाराष्ट्र विरोधी काळे आंदोलन करुन कोरोना विरुध्द अहोरात्र लढणाऱ्या पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग तसेच सर्व कोवीड योध्द्यांचा तसेच महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान केल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने फिजिकल डिस्टंसीगचे पालन करुन टरबुज फोडुन निषेध नोंदविला आहे तसेच महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष देवेंद्र देशमुख, अॅड विरेंद्र झाडोकार, दिलीप पाटील, गजानन अढाव, काॅंग्रेसचे वसंत पाटील आदी उपस्थित होते.