खामगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.अनुजाताई सावळे पाटील यांनी आज नियुक्ती पत्राद्वारे खामगाव शहराच्या महिला शहर अध्यक्ष पदी सौ. सुधाताई भिसे, जिल्हा महिला सरचिटणीस पदी सौ. दुर्गाताई भित्ते. जिल्हा महिला संघटकपदी सौ.भारती काळे यांची निवड करण्यात आली. आज रोजी हॉटेल देवेंद्र येथे पक्ष कार्यालयात जलसंपदा मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष मा. ना. श्री जयंतजी पाटील यांच्या परिसंवाद यात्रा दौरा निमित्य महिला आढावा नियोजन बैठकीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र दादा देशमुख यांच्या कडून त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच जिजाऊ बिग्रेड च्या बुलढाणा जिल्हाअध्यक्ष पदी शिवमती रंजनाताई घिवे यांची निवड झाल्याबद्धल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,महिला, युवक, युवती आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.