खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खामगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले . 10 जून रोजी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आल्या, पक्ष स्थापन दिनानिमित्त कुठेही गाजावाजा न करता राष्ट्रवादी काँग्रेस ने रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून २१ युनिट रक्तदान केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. विश्वनाथ झाडोकार, डॉ.सदानंद इंगळे, शहर अध्यक्ष देवेंद्र देशमुख, गोपाळराव कोल्हे, महेंद्र पाठक,रमाकांत गलांडे, विकास चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान लाहुडकार,तालुका अध्यक्ष सोशल मीडिया दिलीप पाटील, गजानन आढाव, अशोक बहुरूपी, जयराम माळशिकारे, विजय चोपडे,ऋषिकेश बाणाईत, उमेश बाबूळकर, संतोष बोचरे,आनंद गवई, मेडिकल ऑफिसर डॉ. बांते, कक्ष सेवक जामोदे, रक्त पेढी तंत्रज्ञ् राजश्री पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.