डॉ. नकुल उगले (पाटील) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेल प्रदेश सचिव पदी नियुक्ती
खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राज्यातील सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे व कार्याध्यक्ष मोहसिन शेख यांनी 25 जुलै रोजी एका पत्राद्वारे जाहीर केली आहे.
यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष योगेश राजेंद्र सावंत व सौरभ रावसाहेब त्रिभुवन, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अक्षय तुळशीदास कदम उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप भाऊसाहेब शिंदे मराठवाडा विभागीय अध्यक्ष निखिल एकनाथ कदम उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप भाऊसाहेब शिंदे प्रदेश सरचिटणीस किरण गावंडे प्रदेश सचिव पदी डॉ नकुल केशव उगले, डॉ रीना संदीप मोकळ,अमर शिंदे, व अभिषेक शंकरराव पवार यांचा समावेश आहे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष बळकटीसाठी उत्तम कार्य करावे असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.