खामगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खामगाव तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस खामगाव च्या वतीने शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच औचित्य साधून महाराष्ट्रात ८० हजार युवक-युवतींना रोजगार देण्याची योजले आहे.जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या उद्देशातून कौशल विकास योजना व उद्योजक योजने अंतर्गत नोकरी महामेळाव्याचे आयोजन आज येथील हॉटेल देवेंद्र समोर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलसिंह गौतम,रावसाहेब पाटील, डॉ.सदानंद इंगळे, देवेंद्र देशमुख ,मीराताई बावस्कर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये दहावी बारावी पास आयटीआय पदवीधर असलेल्या अनेक युवक- युवतींनी नोंद केली असून लवकरच या सर्वांना आपल्या गुणवत्तेवर नोकऱ्या सुद्धा देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास गोतमारे सर,अँड.वीरेंद्र झाडोकार,दिलीप पाटील,माधव पाटील, मो.आरिफ, अरुण गायगोळ,भगवान लाहुडकर,अशोक बहुरूपे, आनंद तायडे, ज्योतीताई चोपडे,विजय चोपडे, संगीता मोरखडे,विजय कुकरेजा, आकाश खरपडे, रविकांत माहुलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.