२२ जानेवारीला बुंदीच्या लाडूचे वाटप…
खामगाव : श्री. क्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उद्या रविवार दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी वंदेमातरम मंडळाच्या गांधी चौक भागात रामधून भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्त स्थानिक गांधी चौक भागात वंदेमातरम मंडळाच्या वतीने उद्या रविवार दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० वाजे पर्यंत भजन गायक गोपाल शर्मा हारे जी (अकोला मुंबई) यांचा रामधुन भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता मंडप उभारण्यात आला असून या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी गांधी चौकात सकाळी ११ ते १ या वेळेत प्रभू श्रीराम मूर्तीची पूजा अर्चना करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर मेन रोडवर नागरिकांना बुंदीच्या लाडू प्रासादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वंदेमातरम मंडळाच्या वतीने संजय (मुन्ना) पूरवार यांनी केले आहे.