मेहकर : येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा कारसेवक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बल्लूजी मोहरील यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत मोहरील यांचे वय ७७ असून देखील ते भाजपाचे सक्रीय पदाधिकारी होते. राममंदिर निर्माण साठी कारसेवेलाही ते गेले होते. आज राममंदीरात सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत कारसेवकांचा सत्कार कार्यक्रम सुरू असताना सत्कार स्वीकारून खाली बसताच ते कोसळले व त्यांचे निधन झाले.
अयोध्या मध्ये राम मंदिराचे भूमिपूजन भारतचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होते आणि मेहकर मध्ये 1990 पासून तर 1992 पर्यंत राम मंदिराच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होणारे कारसेवक लक्ष्मीकांत मोहरिल यांचा सत्कार कार्यक्रम सूरू असतांना अयोध्या येथील त्यांच्या कारसेवेतील जुन्या आठवणींना उजाळा देत असतांना मोहरील सर एकदम हसत खेळत श्रीरामाचे मोठ मोठाने नारे लावत होते जुन्या आठवणींना उजाळा सुरू होता,अचानक पणे श्री मोहरील सर यांना श्रीराम यांच्या मूर्ती समोर बसले असतांना अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 1992 साली मेहकर येथून मंदिर वही बनायेंगे असे नारा देत थेट आयोध्या पर्यंत पोहोचवून आंदोलनामध्ये सहभागी होऊन विवादित ढाचा धोस्त करून तेथील विटा सुद्धा लक्ष्मीकांत मोहरील यांनी आणलेल्या होत्या. अश्या श्री रामप्रभू च्या भक्ताला श्रीराम मंदिरातच प्रभू चरणी विलीन झाले.
त्यांनी मे.ए.सो.शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नौकरी केली सुद्धा होती. दोन वेळा नगरसेवक तर एकदा नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. ब्राह्मण सभेचे ते पदाधिकारी होते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने दरवर्षी ते बालाजी मंदिरात संत गजानन महाराज प्रगट दिनी सामुहिक पारायणाचे आयोजन करायचे. बालाजी उत्सवातही त्यांचा सहभाग असायचा.त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व परिवार आहे.