अंकुर उगवलेले कपाशीचे बीज केले रान डुक्करनी फस्त
खामगांव( कृष्णा चौधरी )बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुका मधील लाखनवाडा बु येथील शेतकरी बाळकृष्ण सूर्यभान वाकोडे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात गट न ३२९ मध्ये संपूर्ण कपाशीची लागवड करून तुषार सिंचनच्या सहायाने उगवण केली. नेमकेच अंकुर फुटले असताना खामगांव वन विभाग मध्ये येणाऱ्या मांडावा डोंगर मधील रान डुक्कर, वन्य प्राण्यांनी काल रात्री येऊन अंकुर फुटले कपाशीच्या शेतीची नासधूस करून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पूर्वी सुद्धा सदरील शेतमधील भुईमूग पिकाचे सुद्धा रान डुक्कर पीक उध्वस्त केले होते.अद्याप त्याची मदत मिळाली नाही तोच पुन्हा एकदा रान डुक्कर, रानटी जनावरांचा कळप येऊन अंकुर फुटले बी- बियाणे उध्वस्त केले आहे. नेहमी मागणी करून सुद्धा वन विभागला जाग येत नाही.या परिसरामध्ये रान डुक्कर, रोही,हरीण या सर्व वन्य प्राण्यांच्या त्रास हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.तरी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे की या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात यावा.व झालेल्या पिकाचे पंचनामा तत्काळ करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बाळकृष्ण सूर्यभान वाकोडे इतर शेतकरी यांनी वन विभागला केली आहे.