खामगांव : बुलडाणा जिल्हा कुस्तीगीर परिषद तसेच विदर्भ हौशी कबड्डी असो.चे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष,शक्तीउपासक,खामगांवरत्न, समाजभुषण तथा सुप्रसिध्द उद्योगपती राणा गोकुलसिंहजी सानंदा यांचा वाढदिवस गोकुळ अष्टमीच्या दिवशी दरवर्षी विविध विधायक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. त्यानिमित्त यावर्षी सुध्दा गोकुळअष्टमीदिनी समाजभुषण राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या ८६ व्या वर्षात पदार्पणानिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोकुळअष्टमीदिनी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सानंदा निकेतन येथे राखीव, तद्नंतर सकाळी १० वाजता स्व.राजीव गांधी उद्यान येथे हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंहजी यांच्या अश्वारुढ पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता सामान्य रुग्णालयातील लॉयन्स अन्नछत्र येथे गरजूंना भोजनदान करण्यात येणार आहे. सकाळी ११:३० वाजता गोकुळ नगर येथील आदरणीय मातोश्री स्व.सोनाबाई सानंदा यांच्या समाधी स्थळी अभिवादन व वृक्षारोपण तद्नंतर नांदुरा रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रात दर्शन, दुपारी १२ वाजता फरशी, घाटपुरी व ऋषीसंकुल येथील गौरक्षणातील गौमातेचे पुजन करुन चारा व ढेपचे वाटप करण्यात येणार आहे.

दुपारी १२:३० वाजता सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत सानंदा निकेतन येथे कौटुंबिक भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता श्रीकष्ण जन्माष्टमीनिमित्त पुजा संपन्न होणार आहे. साध्या पध्दतीने सोषल डिस्टसिंग ठेउन शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन अश्या विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा होणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सी.एम.हेल्थ क्लब, बुलडाणा जिल्हा कुस्तीगीर संघ,बुलडाणा जिल्हा हौशी कबड्डी संघाच्या समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते यासह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.