महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात आता ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या निकषांबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी २०१८ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये या पैशांचे शेतकऱ्यांना वितरण केले जाते. अशाचप्रकारची योजना लवकरच महाराष्ट्रात राज्य सरकारकडून लागू केली जाणार आहे.
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा विदर्भ शेगांव शेतकरी संग्रामपूर