April 11, 2025
महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा चौथा बळी!

मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून राज्यात आज कोरोनामुळे ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्युमुळे राज्यात कोरोना बळींचा आकडा आता चार वर गेला आहे.

मृत्यू झालेला इसम १५ मार्च रोजी यूएईहून भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबाद येथे आला व नंतर मुंबईत आला होता. ताप, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळं संबंधित व्यक्तीला २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला उच्च रक्तदाब आणि डायबेटिसचा विकारही होता. ‘कोरोना’ च्या आजाराची लक्षणं असल्यानं त्याची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत जाऊन आज त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

मुंबई शहर आणि उपनगर – 38

पिंपरी चिंचवड मनपा – 12

पुणे मनपा – 19

नागपूर – 4

यवतमाळ – 4

नवी मुंबई – 5

कल्याण – 4

सांगली- 4

अहमदनगर – 2

रायगड – 1

ठाणे – 2

पनवेल- 1

उल्हासनगर – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

वसई-विरार- 1

सातारा- 2

Related posts

गुंजकर कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

nirbhid swarajya

तांदूळाच्या काळाबाजाराची सीआयडी मार्फत चौकशी होणार –छगन भुजबळ

nirbhid swarajya

रेती तस्कर कोतवालाला घेऊन पळाला गाडी खाली करून तहसीलमध्ये आला.

nirbhid swarajya
error: Content is protected !!