दिवसरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी उपक्रम
बुलडाणा : कोरोना च्या पार्श्वभूमीवर पोलीस बांधव आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र आपली सेवा देत आहेत , त्यामुळे सेवा बजावत असतांना त्यांना ह्या जीवघेणा कोरोना ची लागण होऊ नये या दृष्टिकोनातून राज्यातील पहिल्या फिरते निर्जंतुकीकरण वाहनाचा शुभारंभ आज बुलडाणा पोलीस अधिक्षक कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. या गाडीमध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. या गाडी मध्ये ६ ते १० सेकंद उभे राहिल्यास निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो.
बुलडाणा मध्ये आता पर्यंत १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून अजूनही आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर आता पॉझिटिव्ह रुग्ण हे संपूर्ण जिल्ह्यात आढळत असल्याने समूह संक्रमणाचा धोका देखील वर्तवण्यात येत आहे.