January 1, 2025
बुलडाणा महाराष्ट्र

राज्यातील तीन झोनपैकी बुलडाणा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये

बुलडाणा : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढवल्यानंतर आता राज्य सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे.
राज्यातल्या जिल्ह्यांची विभागणी ही रेड, ऑरेंज, ग्रीन अशा तीन झोनमध्ये झाली असून त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. रुग्णसंख्येनुसार राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.त्यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

कोरोनाचे १५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून त्यापेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची दाट शक्यता आहे. तर ऑरेंज झोनमधल्या जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील, तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. वाहतुकीत सवलत देण्यात येईल. याशिवाय ५९ पेक्षा कमी कर्मचारी वर्ग असलेली कार्यालय सुरू करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. तर ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळेल. इथले निबंध टप्प्याटप्प्यानं हटवले जातील आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल.

बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून त्यामधील एक रुग्ण मृत्यू पावलेला आहे.
बुलडाणा जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंदच राहतील व जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील तसेच वाहतुकीत सवलत देण्यात येईल.

Related posts

माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात वंचित चे उमेदवार अनिल अंमलकार यांची पोस्ट ला तक्रार…

nirbhid swarajya

खामगावात डि,बी पथकाची मोठी कारवा ईचोरी प्रकरणातील चार आरोपीसह मुद्देमाल जप्त…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 294 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 52 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!