April 18, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

राज्यातील ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी तात्काळ जिल्हानिहाय नियोजन होणे गरजेचे, वेळ पडल्यास आंदोलन करू – अशोक सोनोने,

खामगांव : कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर तात्काळ नियोजन होणे गरजेचे आहे अन्यथा ऑक्सिजन अभावी बऱ्याच रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागेल अशी गंभीर परिस्तिथी आता निर्माण झाली आहे. राज्याची ऑक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाईप सिलिंडर- १५४७, डयुरा सिलिंडर- २३०, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी याबाबत काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सज्ज असणे फार गरजेचे झालंय.राज्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी सरासरी किती रुग्णांना ऑक्सीजन बेड लागतात याचा विश्लेषणात्मक आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात त्यानुसार ऑक्सिजन बेड उपलब्ध असावेत तात्काळ याबाबत नियोजन वाढवण्यात यावं याकरिता प्रत्येकाने पुढाकार घेणे फार गरजेचे झालंय अन्यथा सामान्य माणसांचा उद्रेक होईल आणि वेळवर परिस्तिथी सरकारला हाताळणे शक्य होणार नाही. आता कोरोना ग्रामीण भागात झपाट्याने पसरत चाललेला आहे आणि आता तर येणारे रुग्ण यांना जास्तीत जास्त दम लागणे यामुळे ऑक्सिजन शिवाय अश्या रुग्णांवर आपण पुढील उपचार सुरूच करू शकत नाही आणि दुसरीकडे हा अनिमियत पुरवठा असल्या कारणाने संपूर्ण आरोग्ययंत्रणेचा बट्ट्याबोळ उडालाय तेव्हा राज्यसरकारने तात्काळ याबाबत निर्णय घेऊन ऑक्सिजनची व्यवस्था शेवटच्या घटकापर्यंत होईल अशाच पद्धतीने योग्य नियोजन करून करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन उभारवं लागेल.

Related posts

लक्झरी बसची एपेला जोरदार धड़क ; एक जण ठार

nirbhid swarajya

बारावीत ७९% टक्के मिळवूनही विद्यार्थ्याची आत्महत्या

nirbhid swarajya

प्राथमिक लक्षणे जाणवताच कोविड तपासणी करावी – उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव

nirbhid swarajya
error: Content is protected !!