बुलडाणा : फिजिशियन डॉक्टरांची मोठ्याप्रमाणात कमतरता भासत होती. त्यामुळे जिल्ह्यातील जे फिजिशियन डॉक्टर्स आहेत, त्यांनी स्थानिक शासकीय कोविड रुग्णालयात काही दिवस आपली सेवा देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करावे. असं आवाहन राज्यांचे मंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केल्यावर आतापर्यंत जवळपास 29 ते 30 खाजगी डॉक्टर सेवा देण्यास तयार झालेत. एक-एक दिवस करून हे डॉक्टर कोविड रुग्णालयात विनामूल्य सेवा देण्याचं काम करणार आहेत. मंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राबविलेला हाच पॅटर्न जर राज्यभरात राबविल्या गेला तर नक्कीचं शासकीय रुग्णालयावरील बराच भार कमी होईल. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची आम्ही पत्रकारांनी भेट घेतली. यावेळी बऱ्याच गोष्टी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासल्यास आपला जीव सुद्धा गमवावा लागू शकतो. शासकीय रुग्णालय द्वारे ऑक्सिजन प्लांटचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे. कोरोना टेस्टिंग लॅब साठी टेस्टिंग किट, तसेच कोविड संदर्भातील काही औषधानंचा साठा सुद्धा कमी प्रमाणात आहे. राज्यातील रुग्णालया मधील परिचारिकांचे गेल्या तीन महिन्यापासून पगार सुद्धा मिळाले नाही आहेत. त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयांमध्ये पीपीई किटची कमतरता सुद्धा बऱ्याचवेळा भासते. तसेच सामान्य रुग्णालयात डॉक्टर व परिचालक यांच्या रिक्त जागा सुद्धा अद्याप पर्यंत भरण्यात आलेल्या नाही. ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या सोबत चर्चा करतांना त्यांनी सांगितलंय… या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनस्तरांवर यासर्व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही वारंवार बैठका घेऊन तशा सूचना देखील दिल्या आहेत. लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट उभारण्या संदर्भात आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या पुढील 2 महिन्यात रुग्णांची संख्या वाढू सुद्धा शकते, त्या अनुषंगाने आम्ही तयारी करतोय, जेणेकरून कोणत्याही समस्या रुग्णांना येणार नाही. गेल्या 6 महिन्यांपासून बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेऊन अडचणी सोडविण्याचे काम ना. डॉ.राजेंद्रजी शिंगणे करत आहेत.आम्ही पत्रकारांनी काही गोष्टी एका निवेदनाद्वारे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, वरील बाबींकडे लक्ष देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. बाकी याबाबत आम्ही पत्रकार म्हणून सतत पाठपुरावा करत राहू.
previous post