खामगांव : राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस प्रहार संघटनेतर्फे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात विविध उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना योद्धाचा सत्कार, तसेच रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना फळ वाटप तसेच अनेक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार कोरोनाचा काळ लक्षात घेता कोणताही गाजावाजा न करता वाढदिवस साजरा करण्याचे आदेश आले आहेत असे प्रहार संघटनेचे गजानन लोखंडकार यांनी सांगितले आहे.
त्यानुसार खामगांव मधे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. बच्चू भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णाची सेवा करणाऱ्या कोरोना योद्धाचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर रुग्णालयातील रुग्णाना व त्यांच्या नातेवाइकांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार तर्फे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी गरीब गरजू शेतमजूर यांच्या घरावर टाकायला ताडपत्री वाटप करण्यात आले. निराधारांना जेवण देण्यात आले. तसेच खामगांव मधील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोनाचा काळ लक्षात घेता कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रहारचे गजानन लोखंडकार, शहर प्रमुख अक्षय हातेकर, देवेश लोखंडकार, अमर देशमुख , देवा निबांळकर ,शक्ति ठाकुर, ऋषि कराड, गोलू वानखडे, पवन धेडुंदे, हरीश सारसर, पुरुषोत्तम अंबुसकर, सोमेश धनलोभे,शक्तीसिंग ठाकूर , दिलीप पिंपळेकर, संतोष पवार, अरुण काटे, शांतीलाल कहार,चेतन कदम, एकनाथ वाकडे, श्रीकांत सपकाळ, नितीन कडाळे, किशोर कराळे, गणेश शेगोकार, उमेश मानतकर, संजय सोळंके यांच्यासह आदी उपस्थित होते.