नांदुरा : दारुड्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना तालुक्यातील जिगाव येथे आज 4 ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पतीने पत्नीस धारदार शस्त्राने हत्या करून शेतात पुरविले होते. जाईबाई समाधान तायडे वय ५० रा.जिगाव असे मृत महिलेचे नाव आहे.जिगाव येथील समाधान तायडे हा त्याची पत्नी जाईबाई हिला नेहमी दारूसाठी पैसे मागण्याचा पण ती त्याला पैसे देत नव्हती.त्यातूनच त्याचे नेहमीच वाद व्हायचे अनेक वेळा समाधान ने जाईबाई ला मारहाण सुद्धा केली आहे. काल सुद्धा समाधान याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते मात्र जाईबाई ने पैसे देण्यास नकार दिला.यातूनच त्याने काल रात्रीच्या सुमारास पत्नीची हत्या करून एका शेतात प्रेत पुरवले होते. मात्र आज सकाळी शेतकरी महिला व पुरुष शेतात जात असताना काही शेतकऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी दुर्गंधि जिथुन येत होती तिकडे गेले असता त्यांना सदर मृतदेह दिसला. तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन केला.नांदुरा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला, तेव्हा मृत महिलेची ओळख पटली.याप्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात मनोहर बोरसे, अरुण कुटाफळे हे तपास करीत आहे.
previous post