बुलडाणा : सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांचे अधिनिस्त अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांचे रस्ते अपघात व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यांत आली होती. त्याप्रसंगी कार्यशाळेचे उद्घाटक श्री. राधेशाम चांडक (भाईजी) यांनी वरील उद्गार काढले.सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांचे अधिनिस्त अकोला, बुलडाणा व वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांची “रस्ते अपघात व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दि.०५.०९.२०२३ रोजी बुलडाणा अर्बनच्या ‘गोवर्धन’ ईमारतीमधील सभागृहात पार पडली.
यावेळी मंचावर कार्यशाळेचे उद्घाटक म्हणुन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष श्री.राध्येशाम चांडक तर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. अविनाश धोंडगे, अधिक्षक अभियंता, सा.बा.मंडळ, अकोला, हे उपस्थित होते तर श्री. सुभाष राऊत, कार्यकारी अभियंता, बुलडाणा / वाशिम, श्री. प्रसाद पाटील, कार्यकारी अभियंता, अकोला, श्री. थोटांगे, कार्यकारी अभियंता, खामगांव, यांची प्रमुख उपस्थितीती होती. यावेळी उद्घाटकीय भाषणात केंद्र शासनाच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपघातात दररोज जखमी होणारे व मृत्यु पावणा- यांची संख्या कोरोना काळापेक्षाही गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यासाठी अभियंत्यांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्याबाबत संबंधीत कंत्राटदार यांना प्रोत्साहीत करावे तसेच माहीती फलकांचाही वापर करावा व रस्ते चांगल्या दर्जाचे झाल्यावरही अपघाताचे प्रमाण कमी होणार नाही त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांनी वाहन चालविण्याचा परवाना देण्याची पध्दत अधिक कडक करावी ज्यामुळे भविष्यात अपघातांची संख्या कमी होईल, तसेच आपल्या नोकरीच्या कार्यकाळात व सामजीक जीवनात कसे जगावे याबाबत ही मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात मा. श्री. अविनाश धोंडगे, अधिक्षक अभियंता, सा.बा.मंडळ, अकोला,यांनी रस्ते अपघात कसे कमी होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले व त्यांच्याच संकल्पनेतुन सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते. त्यांनी शिक्षक दिना निमित्य सदर कार्यशाळेचे आयोजन करुन सर्व अभियंता यांना एक आगळी वेगळी भेटच दिली.सदर कार्यशाळेत श्री. प्रताप भोसले यांनी रस्त्यावरील वाहतुकीनुसार रस्त्याचे व इतर अनुशंगीक बाबींचे नियोजन कसे करावे व त्यासोबतचे रस्त्यावरील वाहतुक कशी सुरक्षीत होईल याचे प्रेझेंटेशन केले व मार्गदर्शन केले. श्री. चेतन कनाकीया, नेहा इन्फ्रा, मुंबई यांनी रस्ते बांधकाम व देखभाल करतांना अत्याधुनिक मशीनचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले. श्री. सुमंत अमडेकर, गोदरेज फर्निचर यांनीही वेगवेगळया फर्निचर बाबत मार्गदर्शन केले. श्री. आशिष महाजन व श्रीमती माधुरी राखा, आर. जे. कन्सल्टंट यांनी रस्ते बांधकामातील सुरक्षीतते बाबत मार्गदर्शन केले व श्री. अमित राऊळे, ३एम इंडीया यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी आत्याधुनिक बोर्ड बाबत माहीती व प्रेझेंटेशन दिले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. प्रसाद पाटील, कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग, अकोला, श्री. राजेश राठोड, उप- कार्यकारी अभियंता, सा.बा.उप-विभाग क्र. ०१ व ०२ अकोला व त्यांचे अधिनिस्त अभियंता यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी केला.