April 4, 2025
अमरावती गुन्हेगारी चिखली जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शेतकरी

रविकांत तुपकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी! बुलढाणा न्यायालयाचा निर्णय….

बुलढाणा: शनिवारी मध्यरात्री नंतर अटक करण्यात आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज रविवारी त्यांना बुलढाणा न्यायालयात सादर करण्यात आले असता न्यायाधीशांनी त्यांची ‘एमसीआर’ मध्ये रवानगी करण्याचे आदेश दिले.आत्मदहन आंदोलना नंतर शनिवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.

नंतर रात्री एक वाजताच्या सुमारास त्यांच्यासह २१ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.यामध्ये कलम ३५३, १४७, १४८, १४९, १०९ , ३३६, ३०९ या अजामीनपात्र कलमांचा समावेश आहे.उत्तररात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांना चिखली पोलीस ठाण्यात हलविले होते.आज त्यांना बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायधीशांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Related posts

जिल्हयात आज प्राप्त २९ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महा आवास अभियान

nirbhid swarajya

खामगाव शहर पोस्टचे ५ अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!