खामगांव : संपूर्ण देशात आलेल्या संकटामध्ये अनेक सण उत्सव यावर विसर्जन पडत आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर उपाय योजना करण्यात येत आहे. येणाऱ्या सण बाबत नागरिकांना काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आहे. काही दिवसावर येऊन ठेपलेला रमजान ईद चा सण मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या सणा बाबत खामगाव शहर पोलिसांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये काल शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये मुस्लिम समाजातील काही प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सर्वांचे मनोगत ऐकून पोलिसांनी त्यांना काही सूचना चे पालन करण्याची आदेश देण्यात आले आहे. या मिटिंग मध्ये खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, खामगाव शहर पोलिसांची ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड यांनी उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन व सूचना दिल्या आहे व सर्वांना रमजान ईद च्या शुभेच्छा देऊन मीटिंगचा समारोप करण्यात आला. सदर शांतता समितिची मीटिंग कोरोनाचे सर्व नियम पाळून तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करून घेण्यात आली.
previous post