बुलडाणा : जिल्हा प्रशासनाने गणपती उत्सव रक्तदान व अनाथांना मदत करून साजरा करण्याचे आवाहन केले. त्यानुसार रुद्र गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी सेवा संकल्प आश्रमाच्या निराधार महिलांना जीवन उपयोगी वस्तू व कपड्यांचे वाटप करून वैश्विक महामारीतून देशवासीयांचे रक्षण करण्याची प्रार्थना गणरायांकडे केली.रक्तदान व निराधारांना आधार देत रुद्र ग्रुप बुलडाणा च्या वतीने नुकताच पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प आश्रमात अत्यंत साध्या पद्धतीने गणरायांचा उत्सव साजरा केला.
” जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ” या उदांत विचारसरणीचा सामाजिक उपक्रमातून दिलेला संदेश मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांसाठी एक आदर्श ठरला आहे.यावेळी सेवा संकल्प आश्रमाचे डाँ.नंदू पालवे,आरतीताई पालवे,
यांच्यासह रुद्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.