October 6, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

रक्तदानाच्या माध्यमातून सर्वधर्म जोपासण्याचा उपक्रम अभिनंदनीय- मा.आ.राणा दिलीपकुमार सानंदा

शिवजयंतीदिनी मोरया मित्र मंडळ वाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरामध्ये २१ जणांनी केले रक्तदान

खामगांव: रक्तदान हे पवित्रदान असून रक्तदानामुळे आपण वेळप्रसंगी एखाद्याचे प्राणदेखील वाचवु शकतो. रक्तदानामुळे सर्वधर्म समभाव जोपासला जातो.मोरया मित्र मंडळाने छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबीर घेउन रक्तदान शिबीरामध्ये संकलीत झालेले रक्त एका मुस्लीम बालीकेला देउन जयंतीदिनी छत्रपती षिवरायांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केली आहे. मोरया मित्र मंडळाचा सर्वधर्म जोपासण्याचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून मोरया मित्र मंडळ मोरे संकुल वाडी यांच्या वतीने दरवर्शी प्रमाणे याहीवर्शी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले. याप्रसंगी वाडी ग्राम पंचायतचे सरपंच बंटी मिरगे, उपसरपंच विजय बोर्डे,नगरसेवक किशोरआप्पा भोसले, युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, डाॅ.प्रविण वराडे, एस.एस.देशमुख,तानाजी नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.वाडी ग्राम पंचायतचे उपसरपंच विजय र्बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत गजानन महाराज मंदिर,मोरे संकुल वाडी येथे झालेल्या या रक्तदान शिबीरामध्ये २१ जणांनी  रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यामध्ये आशिष चांदेकर, चेतन झाडोकर, आशिष जुमडे, अंकुष ठाकरे , स्वप्नील राठोड,विवेक देषमुख, कमलेश वाघमारे, अविनाश बायस्कर, प्रशांत जाचक, गजानन गावत्रे,उमेश तुपकर, प्रतीक खरात, अनिल जाधव, शुभम खुमकर, गणेश ताठे, भिमराव थाटे, गोपाल तेलंग यांच्यासह आदींनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरीता सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाचे डाॅ.वकार, सौ.राजश्री पाटील, गाडेकर सिस्टर, मेघा माहुदे, रमेश अवचार आदींची सहकार्य लाभले. यावेळी मंगेश कळसकार, सुरज देषमुख, विवेक जाधव, मंगेश घेंगे, आदीत्य कदम, विलास देशमुख, अमोल वानखडे, अजय पवार, योगेश खर्चे,निखील बाप्पु देशमुख यांच्यासह वाडी येथील ग्रामस्थ, मोरया मित्र मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबीरामध्ये संकलीत झालेले रक्त थॅलेेसेमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या सना फिरदोस या मुस्लीम बालीकेला दिले जाणार आहे.

Related posts

शेतकरी कुटुंबातील कु.प्रिया गोळे जेईई अँडव्हान्स परीक्षेत अकोल्यातून अव्वल

nirbhid swarajya

चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्यावर प्राणघातक हल्ला

nirbhid swarajya

राममंदिर भूमीपूजन दिवशीच राममंदीरात कारसेवकाचे निधन

nirbhid swarajya
error: Content is protected !!