बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगदिन उत्साहात साजरा
खामगाव– योगदिन २१ जून रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर कॉलेजच्या नवीन सत्रास सुरुवात करण्यात आली.२१जून हा इंटरनॅशनल योगदिन असल्यामुळे शाळेच्या वतीने योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर, संस्थेच्या सचिवा सौ. सुरेखा गुंजकर तसेच कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले आणि जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरचे उपमुख्याध्यापक संतोष आल्हाट प्रमुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी योग शिक्षक पुरुषोत्तम निळे यांनी वेगवेगळ्या योगासने प्राणायाम विद्यार्थ्याकडून कडून घेतले. विद्यार्थ्यांना योगा बद्दल मार्गदर्शन सुद्धा केले. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे पालकांनी सुद्धा मुलांसोबत उपस्थिती होती. नवीन सत्रामध्ये विद्यार्थ्यांकरीता नवीन टेक्नॉलॉजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये सुरू झाली असून प्रत्येक रूममध्ये ४८ इंची टीव्ही लावण्यात आली असून त्यासोबत प्रत्येक शिक्षकांना टॅब देण्यात आली आहे. मेट्रोसिटी मध्ये मिळणारे उच्च शिक्षण मुलांना आवार सारख्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल या भागातील विद्यार्थी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये प्रवेश घेत आहेत. यावर्षी सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये प्रवेश घेतलेला आहे. निकालांमध्ये सुद्धा गुंजकर कॉलेजने जिल्ह्यात उच्चांक गाठला असून त्यामुळे पालकांचा शाळा व कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ओढा वाढला आहे.