खामगाव :खामगाव येथील विश्रामगृहात शिवसेना व युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या छोटेखानी बैठकिचे आयोजन केले होते.याच बैठकीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजूभाऊ अवताडे यांच्या नेतृत्वात युवासेनेचे जिल्हा प्रमुख खासदारपुत्र ऋषीकेश प्रतापराव जाधव यांचेहस्ते राजेंद्र रामदास बघे यांची युवासेना तालुका प्रमूखपदी नियुक्ती करण्यात आली.
युवासेनेचे प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील तरूणांचे आयकाँन आहेत…संपूर्ण महाराष्ट्रात युवासेनेचे संघटन मजबूत असून तरूणांच्या प्रश्नासाठी सातत्याने युवा सेना कार्य करत आहे. तरूणासाठी आशेचा किरण म्हणून आज युवा सेनेकडे पाहिले जाते…समस्या कोणतीही असो,त्या ठिकाणी युवा सेनेचे कार्यकर्ते धावून जातात.बुलडाणा जिल्ह्यात ही युवासेनेचे संघटन चागले मजबूत असून सातत्याने तरूणवर्ग युवासेनेत कार्य करण्यासाठी धडपडतांना दिसत आहे…युवा सेना जिल्ह्या प्रमुख ऋषीकेश जाधव यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यात युवकांचे संघटंन मजबूत करण्या करिता मोठ्या संख्येने युवक युवासेनेत दाखल होत आहे.
त्याचाच ऐक भाग म्हणून युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेशाने ऋषी दादांच्या हस्ते राजेंद्र रामदास बघे यांची खामगाव विधानसभेच्या युवासेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी संजय अवताडे,श्रीराम खेलदार,सुरेश वावगे,रमेश भट्टड,राहुल कळमकार, सुभाष वाकुडकर त्यांच्यासह शिवसेना,युवासेना पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती