November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा शिक्षण

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : घाटपुरी नाक्याजवळील अंबिका नगर भागातील एका 24 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी 6:30 वा. च्या दरम्यान उघडकीस आली आहे.
येथील अंबिका नगर भागात राहणारा जयेश संजय देशमुख वय 24 घरी कोणी नसल्याची संधी साधून राहत्या घरातील स्टोअर रूम मधील छताच्या पंख्याला बेडशीट च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली आई वडील तेरवीच्या कार्यक्रमानिमित्त काल बाहेरगावी गेले होते, आज संध्याकाळी आई वडील घरी परत आल्यावर ही घटना उघडकीस आली.जयश हा पुणे येथील कंपनी मधे नोकारीला होता, लॉकडाऊन मधे तो खामगांव येथे आला होता.गेल्या काही दिवस तो नैराश्यात असल्याची माहिती नातेवाईकानी दिली आहे.घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करत असताना जयेश च्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे.सदर चिठ्ठी मधे “आई-बाबा मला माफ करा” मी तुमच्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही’ असे नमूद होते. अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी स्वराज्यशी बोलताना दिली.

Related posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय इसम ठार

nirbhid swarajya

शिष्यवृत्ती परीक्षेत डिझायर कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी राज्यस्तरावर…

nirbhid swarajya

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामातून कोट्यावधी रुपयांचे धान्य गायब

nirbhid swarajya
error: Content is protected !!