खामगाव : ज्ञानगंगापूर येथील बोर्डी नदी शिवारात आज दिनांक 4 जुलै रोजी १ वाजताच्या सुमारास शेतकरी युवक शेतात काम करीत असताना त्यांना हरिणी च्या पिल्लावर काही कुत्रे हल्ला करतांना दिसून आले. मुन्ना खराटे, रणजित महाले, ज्ञानेश्वर महाले या शेतकरी युवकांनी नावे त्या हरिणीच्या पिल्लाला कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून पिल्लाचा जीव वाचवला. त्यानंतर त्या पिल्लावर प्रथमोपचार करून त्याची काळजी हे युवक घेत आहेत. या युवकांच्या सांगण्यावरून त्या पिल्लाचा जन्म १२ ते १३ तास आधी झाला असावा व वनविभागाशी संपर्क करून ते या हरीणीच्या पिल्लाला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. मात्र या युवकांनी सदर पिल्लाचा जीव वाचविला व त्याचा प्रथमोपचार करून वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत ते या पिल्लाचा सांभाळ देखील करत असल्याने त्यांच्या मुक्या प्राण्याप्रती असलेल्या सेवा भावाचे कौतुक होत आहे.
previous post