January 4, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

युथ पॅंथरच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

खामगांव : शहरातील एका अवैद्य कोविड सेंटरला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे अभय असल्यामुळे बिनधास्त सुरू आहे. त्या कोविड सेंटर वर कारवाई करावी य्या करीता युथ पैंथर च्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कोविड सेंटरच्या जाहिरातींच्या माध्यमातून कोविड रुग्णांना आकर्षित करण्यात येत आहे. वास्तविक पाहता निमोनिया, ताप, खोकला असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करतना सरकारी रुग्णालय व नगर परिषदा कळविणे अनिवार्य आहे, तरी सदर रुग्णांची RTPCR तपासणी करून लक्ष ठेवणे आवश्यक असून सदर रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यास त्याला सरकारी कोरोना सेंटरमध्ये पाठवावे लागते. मात्र अवैध कोविड सेंटरमध्ये नियमांना तिलांजली देण्यात येत आहे. उपरोक्त अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत आहे का ? असा प्रश्न केला जात आहे. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्य रुग्णालयात भेट दिली असता अवैध कोविड सेंटरमध्ये आईच्या चुकीच्या उपचाराने मृत्यू झाल्याची तक्रार करणारे गुड्डू बोबडे, पत्रकार किरण मोरे व पत्रकार आनंद गायगोळ यांनी भेट घेतली होती व अवैध कोविड सेंटरची चौकशी करावी असे सांगितले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ यावेळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना चौकशी समितीला पोलीस संरक्षण देण्यात यावी व चौकशी अहवाल त्वरित पाठवण्यात यावा असा आदेश दिला होता. मात्र चौकशीचा अहवाल थंडबस्त्यात पडला आहे. यामुळे हॉस्पिटलच्या संचालक कारवाई होत नाही. कारवाई होत नसल्याने सदर हॉस्पिटल मध्ये अनेक तरुणांची निष्पाप बळी जात असल्याची दिसून येत आहे. याकरिता युथ पँथरच्या वतीने या अगोदर सुद्धा हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन दिले होते. मात्र त्या हॉस्पिटल वर कारवाई न झाल्याने आज त्यामुळे युथ पॅंथरच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात संतोष सावंत,भारत इंगळे, अमोल वानखेडे, सागर सावजी, आदिची उपस्थिती होती.

Related posts

जिल्ह्यात प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

एस टी बस व ४०७ ची समोरा समोर धडक ; एकाचा मृत्यु तर १६ जखमी

nirbhid swarajya

जिल्हयात आजपर्यंत ३५७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!