January 4, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा विदर्भ विविध लेख शेगांव संग्रामपूर

या पत्रकार डॉक्टरचीचं प्रसूती करण्याची वेळ आली आहे?

आदिवासी भागात डॉक्टर कमी पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकारांचा सुळसुळाट

संग्रामपुर : आदिवासी भागात बोगस डॉक्टर कमी आणि पत्रकारीता करणाऱ्या एका पत्रकारांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुठलेही काम न करता आदिवासी भागात बसून पत्रकार बैठकीत गुरगुरणार्या या डॉक्टर कमी पत्रकाराचा पत्रकारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास वाढलेला आहे. निर्भिड स्वराज्यने भाग-1 मध्ये त्या पत्रकारा बद्दल पोल-खोल सुरू करताच संग्रामपूर, वरवट बकाल,जळगाव जामोद ,तसेच पातुर्डा, सोनाळा येथील अनेक पत्रकारांचे व स्थानिक नागरिकांचे फोन व व्हाट्सअप द्वारे मेसेजेस आले व त्यांनी निर्भीड स्वराज्यला सांगितले की या डॉक्टर कमी पत्रकाराचा त्रास आम्हाला 2013 पासून आहे. काही महिन्यांपूर्वी या डॉक्टरने या भागातील एका डॉक्टराने एका महिलेची जबरदस्तीने प्रसूती केली होती. हे प्रकरण त्या मॅनेज करणाऱ्या डॉक्टर कमी पत्रकारानेच काढले होते व त्यासाठी जिल्ह्यातील दोन मीडियाच्या पत्रकारांना सुद्धा हाताशी घेतले होते. सदर प्रकरण मॅनेज करून देतो व कुठल्याही टीव्ही चॅनलला बातम्या लावू देत नाही, यासाठी त्या जबरदस्ती प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांकडून जिल्ह्यातील दोन पत्रकारांना याठिकाणी बोलवून त्यांना मलिदा देण्यात आला होता.

मात्र काही दिवसांनंतर जिल्ह्यातील एका पत्रकाराला सदर प्रकरण माहीत झाल्यावर त्याने बुलडाणा जिल्ह्या पत्रकारच्या ग्रुपच्या व्हाट्सअप ला मेसेज टाकले व त्या जबरदस्ती प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी बातम्या लावल्या होत्या. त्यानंतर त्या डॉक्टरांकडून मलीदा घेतलेल्या जिल्ह्यातील दोन पत्रकारांना सुद्धा डॉक्टरांच्या विरोधात बातम्या लावाव्या लागल्या होत्या. आपण बातम्यां न लावण्याचा मलीदा दिला होता तरीसुद्धा या पत्रकारांनी बातम्या लावल्याच कशा ? याकरिता त्या जबरदस्ती प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनी प्रकरण मॅरेज करून देणाऱ्या त्या “महा’शयाशी जनवाद” घातला. अखेर मलिदा घेणाऱ्या त्या दोन पत्रकारांना पैकी एकाला मलीदा मिळालाच नाही त्यामुळे त्याने बातमी लावली अशीसुद्धा चर्चा जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये रंगली होती.आदिवासी भागात अशा कित्येक डॉक्टरांचे प्रकरणे या ‘जन महा’शयाने’ मॅनेज करून दिले असतील व किती पेशंटचे जीव धोक्यात टाकले असतील हे त्या ‘जन महा’शयालाच’ ठाऊक. या जन ‘महा’शयांच्या मॅनेज प्रकरणाचे आदिवासी भागातील सर्व तालुक्यांतील नागरिकांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे. तसेच या ‘जन महा’शयांचे’ अजून बरेच प्रकरणे कागदोपत्री निर्भिड स्वराज्याला देऊ व त्याच्या विरोधात आदिवासी भागातील काही अन्याय झालेले नागरिक व पेशंट आता पुढं येण्यासाठी तयार झाले आहेत. आदिवासी भागातील या जन महाशयांच्या सेटलमेंट भोजनांच्या बऱ्याच प्रकरणाबाबत असलेली भजन ‘भाऊ’नी सांगितले आहे. आदिवासी भागातील एका कोपऱ्यात ठाण मांडून बसलेल्या सुपारीबाज डॉक्टर पत्रकारांला आदिवासी भागात सेटलमेंट करणारा डॉक्टर या नावाने आता प्रसिद्ध तर मिळालीच आहे. परंतु या डॉक्टर कमी पत्रकाराचे आदिवासी भागाच्या कोपऱ्या पासून ते खामगाव पर्यंत सर्वच डॉक्टरांची प्रकरणं मॅनेज करून देण्यामध्ये नाव माहीर झाले आहे. खामगाव मधे सुद्धा गौडबंगाल करणाऱ्या डॉक्टरची प्रकरण मॅनेज करायचे असले तर ते सुद्धा या जन ‘महा’शयाला बोलवूनच केल्या जातात. खामगाव मध्ये सुद्धा एका ‘महा’लेव्हलच्या डॉक्टरांचे प्रकरण सुद्धा त्याने मॅनेज केले आहे. त्यावर सविस्तर वृत्त पुढील भागात……..निर्भीड स्वराज्य कडून आवाहन करण्यात येतंय, या जन ‘महा’शयाचे अजून काही प्रकरणे असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा. तुमचं नाव गुप्त ठेवल्या जाईल अन्यथा या मॅनेज करणाऱ्या डॉक्टर कमी पत्रकारांकडून पत्रकारांचीच नव्हे तर पेशंटचे सुद्धा जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळं आता या पत्रकार डॉक्टरचीचं प्रसूती करण्याची वेळ आली आहे.

तुर्तोस एवढे…..!
क्रमशः
लवकरच भाग:-3

Related posts

इलेक्ट्रिशन व प्लंबर संघटनेची कार्यकारणी जाहिर

nirbhid swarajya

तालुक्यातील शेतकरी सुखावला आता येणार पेरणीला वेग

nirbhid swarajya

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाबाबत सूचना निर्गमित

nirbhid swarajya
error: Content is protected !!