January 6, 2025
बातम्या

मोदींनी मानले देशवासियांचे आभार

सोशल मीडिया अपडेट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरात नागरिकांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यु पाळला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्यास, नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर, मोदींच्या आवाहनानुसार देशातील कोरोना संकटाच्या काळात आपलं योगदान देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता काल व्यक्त करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटनाद करत देशातील डॉक्टर्स आणि पोलिसांप्रति आदर व्यक्त केला. तसेच, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. देशावासियांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि कृतज्ञतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन देशवासियांची आभार मानले आहेत सोबत करोना संकटकाळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व देशबांधवांनाही नमन केले. कोरोनासोबतची आपली लढाई संपली असून आता खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे, नागरकिांनी घराबाहेर पडू नये. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही मोदींनी म्हटले. एका मोठ्या लढाईसाठी आपण एकमेकांपासून दूर पाहून या लढाईत आपलं योगदान देऊ, असेही पंतप्रधान यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. नियमित जनता कर्फ्युनंतर लोकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकून भारत माता की जय च्या घोषणा दिला. देशातील वातावरण या ५ मिनिटांसाठी स्फुर्तीमय बनले होते. कोरोना विषाणूचा अत्यंत झपाट्याने फैलाव होताना दिसत आहे. कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी देशवासीयांना रविवारी म्हणजे २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यास सांगितल होत. कोरोनाच्या तिसऱ्या व अतिशय संवेदनशील टप्प्यावर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

Related posts

माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ;भाजप कार्यकर्त्याला मारहाण केलीच नसल्याचा दावा!…

nirbhid swarajya

सुटाळा बु.येथील शोरूम मधील जळालेल्या युवकाचा अखेर मृत्यू…

nirbhid swarajya

आ.ॲड.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमीत्त घरकुल लाभार्थ्यांचा सत्कार

nirbhid swarajya
error: Content is protected !!