April 4, 2025
गुन्हेगारी जिल्हा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मोताळा

मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या

मोताळा : येथील तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या शासकीय निवासस्थानात कोतवालाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची खळबळजनक घटना सायंकाळच्या सुमारास उघडकिस आली. विष्णू शंकर सुरपाटणे ४४, रा. मोताळा असे आत्महत्या केलेल्या कोतवालाचे नाव आहे. विष्णू सुरपाटणे हे मोताळा तहसील कार्यालय व कार्यालय परिसरातच असणाऱ्या तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानाची देखरेखीचे काम करायचे. आज रविवारची सुटी असल्याने तहसील कार्यालय परिसरात वर्दळ नव्हती.

दुपारी ३ च्या दरम्यान सुरपाटने यांनी सहकाऱ्यांसोबत चहापाणी सुद्धा घेतले होते. सायंकाळी त्यांचा फोन लागत नसल्याने सुरपाटणे यांचा मुलगा त्यांना शोधायला तहसीलदारांच्या निवासस्थानी पोहोचला. शासकीय निवासस्थानातील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात येताच दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विष्णू सुरपाटणे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतक विष्णु सुरपाटणे खिशात एक चिट्ठी सापडल्याची माहिती आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहे.

Related posts

रविवारी खामगावात कुणबी समाज वधु – वर परिचय मेळावा

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 361 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 107 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 313 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 118 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!