पीपल्स फॉर ॲनिमल” या संस्थेच्या उपक्रम
खामगाव:मोकाट कुत्र्यांचा त्रास सर्वांना होत असतो,परंतु त्यांनाही जीव आहे या भावनेने काम करणारी जीवदया क्षेत्रातील अखिल भारतीय स्तरावरील खासदार मेनका गांधी नी स्थापन केलेल्या “पीपल्स फॉर ॲनिमल” या संस्थेच्या खामगाव शाखेतर्फे मागील काही दिवसापासून शहरातील मोकाट कुत्र्यांना तसेच मोकाट गाई ढोरांच्या आरोग्याची काळजी घेतन्या चे पवित्र कार्य केले जात आहे. त्यासाठी संस्थेच्या खामगाव शाखे च्या कार्यकर्त्यांनी मोकाट कुत्र्यांना ॲंटी रेबिज चे इंजेक्शन देणे, खाज खरूज ची औषधी देणे, गळ्यामध्ये रेडियम चा पट्टा घालने, ज्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांनी त्यांना इजा होऊ नये इत्यादी कामे संस्थेच्या कार्यकर्त्यां मार्फत तसेच गुरांच्या डॉक्टरांच्या मार्फत केल्या जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून जलंब येथे मोकाट कुत्र्यांना अँन्टीरॅबिज् चे इंजेक्शन व खाजेच्या गोळ्या देण्यात आल्या तसेच मोकाट गाई ढोरांना रेडियम चे पट्टे घालण्यात आले. या कार्यामध्ये या पीपल्स फॉर ऍनिमल च्या सुनिता आयलाणी, सौ.शिवानी कुळकर्णी, प्रकृती चव्हाण, सौम्या कुळकर्णी, देवी पेशवानी,कल्पना व खुशी चांडक,नेत्र भारूका तसेच डॉ. घाटे खामगाव व सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्था जलम्ब चे उद्धव दिवाकर नेरकर, किशोर सोनटक्के, श्रीकृष्ण असंबे, भिकाजी पायघन, केशव नेरकर, निलेश खुमकर, महादेव सोनटक्के आदींनी भाग घेतला. मोकाट कुत्र्यांच्या बाबत जेथे सर्वत्र हेटाळणी होत असते तेथे या जनावरांना सुद्धा आपलेसे करून त्यांच्या आरोग्याची काळजी या संस्थेमार्फत घेतल्या जात . जलंब मध्ये संपूर्ण गावातून फेरी मारून एकूण ५६ कुत्र्यांना रेडियम बेल्ट, अँटी रेबीज चा डोज व खाज खरूज औषधी चे वाटप करण्यात आले तसेच सदर कार्यक्रम आयोजित केल्यामुळे गावकर्यांनी सर्वांचे आभार मानले.व आनंद व्यक्त केला.