खामगांव : नांदुरा रोडवरील तुळजाई मेडिकल व जलंब नाक्यावरिल एका मेडिकल मधे चोरांनी लाखोंचा डल्ला मारला होता. याप्रकरणी खामगांव शहर पोलिसांनी एकास जालना येथून अटक केली आहे. २१ रोजी रात्री तवेरा गाडीने येऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दोन्ही मेडिकल मधून ३ लाख २० हजाराची चोरी केली होती. याप्रकरणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान शहर पोलिसांनी आपली चक्र फिरवत जालना येथून संजूसिंग कृष्णासिंग भादा २५ रा. गुरुगोविंदसिंग कॉलनी जालना येथून रात्रि ११ वाजताच्या सुमारास अटक केली आहे. संजुसिंग भादा जवळून तवेरा गाडी क्रमांक एमएच-२०- सीएच-८७८६ व चोरी करण्याची साहित्य जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी वर महाराष्ट्रत जवळपास २८ चोरीचे गुन्हे दाखल आहेत व आरोपी याने आणखी दहा ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले.खामगांव शहर पोलिसांनी काही तासातच चोरीचा छड़ा लावला आहे.