बुलडाणा : वैश्विक महामारी आणि राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित झालेल्या कोरोनाच्या लढाईमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने आपले राष्ट्रीयकर्तव्य, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. तोच प्रयत्न मुहम्मद पैंगंबर बुलडाणा यांच्यातर्फे अभियान राबवून भुकेल्या, तहानलेल्या गरजू परिवारासाठी अन्नदानाच्या माध्यमातून करत आहे. या अभिनव उपक्रमात मुस्लिम समाज बांधवकडून अनाथ बालके व गरजु कुटुंबयासमवेत ईद साजरी केली जाणार आहे. रमजान हा समस्त मानव सेवेसाठी समर्पित समाज निर्माण करण्यासाठीचा प्रशिक्षणाचा महीना आहे. रोजा हा वाईट गोष्टीचा त्याग, सत्कर्म, परोपकार, नैतिकता, करुणा, दयाशीलता, व गरजु शोषित अनाथ बालके व विधवांना मदत करण्याची प्रेरणा देतो, इस्लाम हा केवळ मुस्लिमाचा धर्म आहे हा गैरसमज असून इस्लाम ही मानव जातीची जीवन पद्धति आहे असा हज़रत मुहम्मद पैंगंबर यांचा संदेश प्रत्यक्ष कृतीमधून समाजापुढे आणण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे अशी माहिती मोहसिन शेख ( अभियानचे जिल्हा सदस्य) यांनी दिली आहे. तसेच गरिबांना कपड़े व राशन चे वितरण करण्यात येणार आहे.
आमच्या जवळ ४० पेक्षा जास्त मुलांसाठी कपड़े जमा झालेले आहेत. जर आपण गरजु व गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे तर आपली साथ मोलाची राहिल असे देखील त्यांनी सांगितले आहे.
previous post